१५ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्या प्रकरणी न्यायालयाने मनोज तिवारीला फरार घोषित केले होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पथक मनोज तिवारीचा शोध घेत होते. तिवारी हा जुहूत लपून बसल्याची माहिती पोलिसां ना मिळाली होती. पोलिसांनी तिवारी कुटुंबीयांच्या ओळखी च्या व्यक्तीच्या माध्यमातून मनोज तिवारीच्या पत्नीला फोन केला. पती घरात आहे का अशी विचारणा त्याने केली असता मनोजच्या पत्नीनेही होकार दिला. यानंतर पोलिसांच्या पथकाने तिवारीच्या घरात धडक दिली. पोलिसांना पाहून मनोजची पत्नी वंदनाने दरवाजा बंद केला. शेवटी पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आणि तिवारीच्या घरात प्रवेश केला. घरातील तिन्ही खोल्यांमध्ये पोलिसां नी मनोजचा शोध घेतला. मात्र, मनोज एकाही खोलीत नव्हता. याच दरम्यान पोलिसांची नजर घरातील वॉशिंग मशिनकडे गेली. वॉशिंग मशिनवर कापड टाकलेला असला तरी आतमध्ये काही हालचाली होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी कापड हटवताच आतमध्ये मनोज लपून बसल्याचे स्पष्ट झाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews